
सोने कारागिराचे अपहरण करून अडीच लाखांचे दागिने चोरून पळालेल्या चौघांना एल. टी. मार्ग पोलिसांनी अटक केली. दिनेश बंतानी, इब्राहिम शेख, करण मगर आणि रियाज शेख अशी त्या चौघांची नावे आहेत. त्या चौघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार हा सोने कारागीर असून ते झव्हेरी बाजार येथील एका सोन्याच्या कारखान्यात काम करतात. तीन दिवसांपूर्वी ते अडीच लाखांचे दागिने घेऊन जात होते. झव्हेरी बाजार येथील विठ्ठलवाडी येथून जात असतानाच तिघांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्ला करून त्याने तक्रारदार यांना टॅक्सीत बसवले. काही अंतर गेल्यावर त्याने तक्रारदार यांच्याकडील अडीच लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर तिघे ते पळून गेले. घडल्याप्रकरणी तक्रारदाराने एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. अपहरण करणाऱया त्या चौघांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्या चौघांना शिवडी येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने अपहरणाची कबुली दिली.





























































