किनगावच्या बसस्थानकात बसखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू

759

किनगाव येथील सेवा सुविधांचा अभाव असलेल्या बसस्थानकात बसच्या चाकाखाली चिरडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. हा वृद्ध प्रवासी अहमदपूरहून प्रवास करून किनगाव येथे उतरला होता. उतरून जात असताना तीच बस पाठीमागे येत असल्याचे लक्षात न आल्याने झालेल्या अपघातात चिरडून त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजता ही घटना घडली आहे.

सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर- अंबेजोगाई बस क्र. एम.एच. 14 बी.टी 1419 याच बसने मयत नामे वामन नागोराव गायकवाड (70, रा. चिखली) हा अहमदपूरहून किनगाव बसस्थानकात त्याच गाडीने उतरून पाठीमागे जात असतांना हीच गाडी चालक सुभाष चंद्रकांत कांगणे बॅच क्र. 604 यांने ही बस बसस्थानकात पाठीमागे घेत असताना अचानक गाडीच्या मागील चाकाखाली सापडून गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या