
बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेचं सगळ्यांना आकर्षण असतं. मात्र, कास्टिंग काउचच्या निमित्ताने या जगाची एक काळी बाजू सर्वांसमोर येत असते. असाच एक अनुभव टीव्ही जगतातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मांडला आहे.
या अभिनेत्रीचं नाव किश्वर मर्चंट असं असून तिने तिच्याबाबतीत घडलेला एक नकोसा अनुभव कथन केला आहे. किश्वरने वयाच्या 23 व्या वर्षीच अभिनयात करिअर करायला सुरुवात केली होती. त्या दरम्यान किश्वरला एका कटू अनुभवाचा सामना करावा लागला.
या अनुभवाविषयी बोलताना किश्वर म्हणाली की, खरंतर टीव्ही शोमधून तुम्हाला रातोरात प्रसिद्धी मिळते. ती प्रसिद्धी चित्रपटातली एखादी छोटीशी भूमिका देऊ शकत नाही. तरीही मला चित्रपटात काम करायचं होतं. मात्र, चित्रपटात रोल मिळावा म्हणून जेव्हा मी निर्मात्यांसोबत भेट घेतली तेव्हा मला कास्टिंग काऊचच्या अनुभवाला सामोरं जावं लागलं.
निर्मात्यांनी मला काम मिळवण्यासाठी चित्रपटाच्या हिरोसोबत शय्यासोबत करण्याचा सल्ला दिला. तो सल्ला ऐकून मला आश्चर्य वाटलं. पण, मी तिथून निघून आले. आज तो निर्माता आणि अभिनेता बॉलिवूडमधली प्रसिद्ध नावं आहेत, असा खुलासा किश्वरने केला आहे.



























































