
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडिया 4 दिवसीय सराव सामना खेळत आहे. 28 नोव्हेंबरला सुरू झालेल्या या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे धुतला गेला. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून पृथ्वी शॉ आणि के.एल. राहुल हे सलामीवीर मैदानात उतरले. परंतु के.एल. राहुलचा खराब फॉर्म ऑस्ट्रेलियातही सुरुच आहे. राहुल फक्त 3 धावांवर बाद झाला. त्याच्या सततच्या खराब फॉर्ममुळे नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरले असून फक्त कमी षटकांचे सामने खेळण्याचा सल्ला दिला आहे.
Here’s how KL Rahul fell to be India’s first wicket this morning.
WATCH LIVE: #CAXIvIND https://t.co/bRjvo3LvLP pic.twitter.com/wTWx2GItUE
— cricket.com.au (@cricketcomau) November 28, 2018
इंग्लंड दौऱ्यात राहुलचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियात त्याच्याकडून पुन्हा एकदा पूर्वीचा खेळ पाहण्याची प्रेक्षकांना आशा होती. परंतु सराव सामन्यातच त्याचा खेळ उघडा पडला. सातत्याने राहुल खराब फॉर्ममध्ये असल्याने नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली आहे. राहुलला वगळून मुरली विजयचा संधी देण्यात यावी अशी मागणीही नेटकऱ्यांनी केली आहे. राहुल सतत एकाच पद्धतीने बाद होत असल्याने पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉ आणि मुरली विजय ही जोडी दिसण्याची शक्यता आहे.
Why should pick @klrahul11… He is not a cricketer… please @BCCI @klrahul11 should be dropped… .??
— Meet Soni23 (@meets023) November 28, 2018
KL must be restricted to limited overs format. Longer format game not a cup of cake for him.
— Shyam Sundar (@shyind) November 29, 2018
Sach batao, KL Rahul is in the team becoz of his beard naa? Virat loves players with beards. Hain naa..?
— Dhumketu (@acharyasayan) November 29, 2018
पहिल्या डावात टीम इंडियाचे त्रिशतक
सलामीवीर राहुल फ्लॉ ठरला असला तरी टीम इंडियाने पहिल्या डावात 358 धावा उभारल्या. यात 5 फलंदाजांनी दमदार अर्धशतकांचे योगदान दिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 24 धावा केल्या असून ते 334 धावांनी पिछाडीवर आहे.


























































