वैयक्तिक रागामुळे मानसिक तणावातून चीनमधील सुपरमार्केटमध्ये एका व्यक्तीने चाकूहल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला तर अन्य 15 जण जखमी झाले आहेत. शांघाईतील एका सुपरमार्केटमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
लिन असे आरोपीचे नाव असून त्याने वैयक्तिक आर्थिक वादातून हा हल्ला केला. या हल्ल्यात 18 जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोराला सुपरमार्केटमधून अटक केली. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.