आंध्र प्रदेशचे माजी विधानसभाध्यक्ष कोडेला राव यांची आत्महत्या

282
file photo


आंध्र प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) ज्येष्ठ नेते कोडेला शिव प्रसाद राव यांनी आज राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शिव प्रसाद राव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना आपण राव कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

कोडेला शिव प्रसाद राव हे सहा वेळा खासदार बनले होते. विभाजनानंतर आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. कोडेला सन 1985 मध्ये माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या