
काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी निकाल दिला होता. त्या निकालावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाने देऊ केलेली पाच एकर जमिनीचे दान नको अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
ओवैसी यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी ट्विटरच्या माध्यमातून एक ट्वीट शेअर केलं होतं. त्यावर अभिनेत्री कोयना मित्राने त्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. बिग बॉसच्या 13व्या सिझनमधून नुकतीच बाहेर पडलेल्या आणि अभिनयापेक्षा वादामुळे जास्त ओळखल्या जाणाऱ्या कोयना हिने ओवैसी यांच्या ट्वीटला उत्तर देताना, आधी आमची 40 हजार मंदिरं परत द्या, असं म्हटलं आहे. ओवैसी यांनी ट्विटरवर एक लेख शेअर करत खाली ‘मला माझी मशीद परत हवी आहे.’ असं लिहित ट्वीट केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना कोयना मित्रा हिने 40 हजार मंदिरंही परत हवी आहेत, असं ट्वीट केलं.
I want our 40,000 temples back. #IdiotOwaisi https://t.co/UJJjrrVEQu
— Koena Mitra (@koenamitra) November 16, 2019
या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी कोयनाची पाठराखण केली आहे. अनेकांनी तिच्या या सडेतोड उत्तरांच कौतुक केलं आहे. औवेसी यांनी शांत बसणंच उत्तम असं सांगत त्यांना विरोध करणारे अनेक हॅशटॅग ट्रेन्ड केले आहेत.
























































