कोहलीचे ‘ नंबर वन’चे सिंहासन कायम

75

सामना ऑनलाईन । दुबई

 ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने ‘आयसीसी’च्या फलंदाजी क्रमवारीतील ‘नंबर वन’चे सिंहासन कायम राखले आहे. याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला तीन स्थानांचा फायदा झाला असून, त्याने 19व्या स्थानावर झेप घेतली आहे. कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत 46 व 58 धावा करून कारकिर्दीतील सर्वोत्तम 937 रेटिंग गुणांची कमाई केली. रेटिंग गुणांच्या बाबतीत विराट कोहली सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत 11व्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजारा कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानावर असून, इशांत शर्मा गोलंदाजी क्रमवारीत 25व्या स्थानावर आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने फलंदाजी क्रमवारीत 29 स्थानांनी प्रगती करताना 43व्या क्रमांकावर झेप घेतली आहे, तर गोलंदाजी क्रमवारीतही त्याने 11 क्रमांकांनी सुधारणा करताना 55व्या स्थानी झेप घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या