देवगड – दारूबंदी विरोधात महिलांचा मोर्चा

469

देवगड तालुक्यातील फणसगाव मधील महिलांनी गावात दारूबंदीच्या जनजागृती करण्यासाठी सोमवारी सकाळी भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये सुमारे 100 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या रॅलीचे नेतृत्व महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा वंदना नरसाळे यांनी केले.

दारू व्यवसायामुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत. त्यामध्ये काहीही दोष नसताना महिलांना त्याची आयुष्यभर शिक्षा भोगावी लागते. अलीकडे तरुण पिढी ही या व्यसनाकडे वळली असून यामुळे समाजाचे आणि गावाचे नुकसान होत असल्याने फणसगावातील महिलांनी एक पाउल पुढे टाकून या विरुध्द बंड पुकारले. याबाबतचे लेखी निवेदन सबंधित अधिकारी यांना देण्यात आले होते. यावेळी दारूबंदी होण्यासाठी जनजागृती व्हावी विविध घोषणा देण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या