ईको गाडी चालकाचा प्रामाणिकपणा, सोन्याचे ब्रेसलेट दिले परत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गव्हाणफाटा या मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ईको गाडी चालकास आपल्या गाडीत सापडलेला सोन्याचा ब्रेसलेट दोन दिवसांनी प्रवाशांना परत दिल्याने बाळकृष्ण मोकल या प्रामाणिक ईको गाडी चालकाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

चिरनेर गावातील बाळकृष्ण मोकल हा गरीब तरुण आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चिरनेर-गव्हाणफाटा या मार्गावर प्रवाशी वाहतूक करणारी ईको गाडी ही चालवत आहे. बाळकृष्ण मोकल या चालकास बुधवारी आपल्या गाडीत सोन्याचा ब्रेसलेट सापडला होता. हा ब्रेसलेट सापडल्यानंतर त्यांनी ब्रेसलेट हरविलेल्या प्रवाशाची चौकशी सूरू केली. मात्र काही वेळाने सावंत नावाचा प्रवासी ब्रेसलेट शाधण्यासाठी चौकशी करत असल्याचे त्यांना समजले. यानंतर बाळकृष्ण मोकल यांनी सदर सोन्याचा ब्रेसलेट आपल्या गाडीत सापडल्याचे त्यांना सांगितले आणि समाधान मोकल यांच्या उपस्थितीत सदर सोन्याचा ब्रेसलेट सावंत सरांच्या हातात सूपूर्द केला. बाळकृष्ण मोकल यांच्या या प्रामाणिक पणाचे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.