Kokan News – पालकमंत्री विकासकामात व्यस्त, अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देतात; काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांची टीका

रत्नागिरीचे पालकमंत्री विकास कामात व्यस्त आहेत. रत्नागिरीतील समस्यांबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे समस्या मांडली असता उडवा उडवीची उत्तरे मिळतात, असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, रत्नागिरीतील सर्व रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.काही महत्वाच्या प्रश्नांवर आंदोलनही केले होते अशी माहिती रमेश कीर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, सोमवारी (29 सप्टेंबर) दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यकर्ता शिबिर आयोजित केले होते.पक्षाचे निरीक्षक शशांक बावचकर यांनी मार्गदर्शन केले.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आढावा घेतल्याचे सांगितले.यावेळी निरीक्षक शंशांक बावचकर,प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलफे,जिल्हाध्यक्ष नरूद्दीन सय्यद आणि सुरेश कातकर उपस्थित होते.