
वटपौर्णिमेनिमित्त पूजेनंतर महिलांची प्रदक्षिणा सुरू असतानाच, करवीरनिवासिनी श्रीअंबाबाई मंदिरातील रामाचा पार म्हणून ओळखल्या जाणाऱया वटवृक्षाला आग लागल्याचा प्रकार घडला. सुरक्षारक्षक व नागरिकांनी तत्परता दाखविल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
आज सकाळपासूनच कोल्हापूरसह राज्यभरात वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा झाला. विवाहित महिला वडाच्या झाडाला फेरी मारून दोर बांधताना वटवृक्षाची पूजा करतात. येथील करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील रामाचा पार म्हणून ओळखल्या जाणाऱया वटवृक्षाच्या पूजनासाठीही विवाहित महिलांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी कापूर आणि उदबत्तीमुळे वटवृक्षाला गुंडाळण्यात आलेल्या दोरांना आग लागली. त्यामुळे वटवृक्षाने पेट घेऊन आग भडकू लागली. यावेळी महिलांमध्ये गोंधळ उडाला. तत्काळ अग्निरोधक मशीनच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
View this post on Instagram
























































