सामना ऑनलाईन । कोल्हापूर
पुणे-बंगळुरू महामार्गावर किणी टोल नाका भागात शिवशाही बसला शुक्रवारी पहाटे अपघात झाला. या अपघातात बसमधील एक व्यक्ती ठार झाली तर 18 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते.
शिवशाही बस पुण्याहून कुडाळला जात होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास किणी टोल नाक्याजवळ मागून आलेल्या एका ट्रकने शिवशाही बसला धडक दिली आणि हा अपघात झाला असे सांगण्यात येत.



























































