कोल्हापूर जिल्ह्यात 47 नवीन कोरोनाबधित आढळले, रुग्ण संख्या 483 वर

562

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 47 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची एकुण संख्या 483 झाली आहे. सीपीआर प्रशासनाकडून मात्र सकाळी दहा पर्यंतचीच आकडेवारी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 10 वाजता 313 प्राप्त अहवालापैकी चंदगड-1, राधानगरी-3, शाहूवाडी-4 तर सोलापूर-1 असे ९ अहवाल पॉझीटिव्ह तर 285 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये सिंधुदुर्गच्या 19 अहवालांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 341 पॉझीटिव्ह रुग्ण असून, आतापर्यंतचा आकडा 436 इतका झाला असल्याची माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केम्पी-पाटील यांनी दिली.

दरम्यान, दुपारी अडीच च्या सुमारास आणखी अहवाल आले. यामध्ये 30 जण पाॅझीटिव्ह आल्याने एकुण कोरोना रुग्णांची संख्या 466 झाली होती. तर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आणखी 17 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या एकुण 483 वर पोहोचली होती. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.

आपली प्रतिक्रिया द्या