कोल्हापूरात कोरोनाचा पाचवा बळी, माजी पोलिसाचा मृत्यू

412

कोल्हापूरमध्ये शनिवारी रात्री एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती हे हेब्बाळ-जलद्याळ ता.गडहिंग्लज येथील असून हा कोरोनाचा जिल्ह्यातील पाचवा बळी आहे. दरम्यान मृत झालेल्या व्यक्तीची पत्नी आणि मुलगा यांचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

माजी पोलीस कर्मचारी असुन,दि.18 मे रोजी कुटुंबीयासह मुंबईहुन गावी आले होते.आज सकाळी त्यांचा सीपीआर येथे मृत्यू झाला.रात्री उशिरा प्रशासनाकडून हि माहिती मिळाली. हे कुटुंब मुंबई येथुन गावी आल्यानंतर गावा बाहेरील घरात सर्वजण क्वारंन्टाईन झाले होते. त्रास होऊ लागल्याने शुक्रवारी उपचारासाठी त्यांना सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले होते.पण आज सकाळीच या माजी पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या