अखेर कोल्हापुरात कोरोनाचा शिरकाव, कोरोना पाॅझीटीव्ह तरुण आढळला

871

अखेर कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळची पेठवडगाव, ता. हातकणंगले येथील एक युवती ईश्वरपुर, जि. सांगली येथील कोरोना बाधीतांच्या संपर्कात आल्याने, तिचा अहवाल पाॅझीटिव्ह आला आहे. सध्या तिच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुर शहरात मंगळवार पेठेतील एका उच्चभ्रू इमारतीतील एका 34 वर्षीय तरुणाचाही अहवाल पाॅझीटिव्ह आला आहे. त्यामुळे या परिसरात महानगरपालिकेच्या वतीने औषधफवारणी करण्यात आली. संबंधित कोरोनाबाधीत युवती आणि तरुणांशी संपर्क आलेल्यांचा शोध घेऊन, सर्वांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.

कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत परदेशातुन जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची संख्या 782 झाली आहे. यामधील 289 जणांचे 14 दिवसांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. यातील 493 प्रवासी घरी देखरेखीखाली आहेत.नतर देशात मुंबई, पुणेसह कोरोनाबाधीत शहरातुन आलेल्यांची संख्या तब्बल 51 हजार 699 असुन यापैकी घरी 50 हजार 127 जणांना अलगीकरण करण्यात आले आहे. तर यातील 1 हजार 572 जणांची 14 दिवसांची तपासणी पूर्ण झाली आहे.

सध्या 424 जण कोरोना सदृश्य लक्षणामुळे उपचार घेत आहेत. आतापर्यंत 107 जणांचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले आहेत. यातील 81 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असुन, 17 अहवाल अप्राप्त आणि 8 जणांचे नमुने फेटाळले आहेत. जिल्ह्यात सध्या एकाचा अहवाल पाॅझीटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालातुन स्पष्ट होते.

प्रशासनाची गुप्तता पण सोशल मीडियामुळे अधिक जनजागृती

कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. पण अशा गंभीर परिस्थितीत अनेक वेळा आरोग्य यंत्रणेतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाकडून जेवढी जनजागृती करण्यात आली, तेवढीच गुप्तता पाळण्यात आली. सध्या कोरोनाग्रस्त कोणत्या भागातील आहे. याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली नसली तरी सोशल मीडियातून मात्र संबंधित कोरोनाग्रस्तांचे नाव आणि फोटो व्हायरल होत होते. परिणामी धास्तीने अनेकांनी घरातच राहणे पसंत केले.

आपली प्रतिक्रिया द्या