पत्र देवून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधीसह संबंधितांवर होणार गुन्हा दाखल

342
फोटो- प्रातिनिधीक

लोकप्रतिनिधी, विविध संस्था आणि प्रतिष्ठित व्यक्तींची पत्र देऊन बाहेरुन जिल्ह्यामध्ये लोकांना पाठवित आहेत. यामुळे संचारबंदी आणि जिल्हा बंदीचे उल्लंघन होत असल्याने,अशा लोकप्रतिनिधी,संस्था तसेच संबंधित व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.यामध्ये पत्रासह संबंधिताचे वाहनही जप्त होणार आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेसाठी जिल्ह्यामध्ये संचारबंदी आणि जिल्हा बंदीही लागू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याबाहेरील काही प्रतिष्ठित व्यक्ती,संस्था, काही जबाबदार लोकप्रतिनिधी काही व्यक्तींना पत्र देत आहेत.अशा व्यक्ती निरनिराळ्या तपासणी नाक्यांवर पत्र दाखवून जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत येत आहेत.तसेच जिल्ह्यात प्रवेश देण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत. अशा व्यक्ती अचानक आल्याने, संसर्ग वाढून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमोडून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.असे प्रकारही घडलेले आहेत.त्यामुळे कुठल्याही संस्था,लोकप्रतिनिधी यांनी अशी बेकायदेशीर पत्रे देवून संचारबंदीचे उल्लंघन करु नये असे आवाहन करुन,जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याविरुध कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत. संस्था,प्रतिष्ठित व्यक्ती,लोकप्रतिनिधी यांनी अशी पत्र देवून नयेत.अशी पत्रे दिली असल्यास त्वरित मागे घ्यावीत.मागे घेतली नाहीत तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या