सावकारीतून हॉटेल मालकावर हल्ला, कोल्हापूर शहरातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

खासगी सावकारीतील पैशांच्या वसुलीतून राजारामपुरी परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकावर चाकूहल्ला झाल्याची घटना घडली आहे. हल्लेखोर खासगी सावकार फरार झाला असून, याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत हल्लेखोराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वल्लभ राजेंद्र जामसांडेकर (वय 33, रा. राजारामपुरी पहिली गल्ली) असे जखमीचे नाव असून, कुलदीप गायकवाड (वय 35, रा. महालक्ष्मीनगर) याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वल्लभ जामसांडेकर याने हॉटेल व्यवसायासाठी कुलदीप गायकवाड याच्याकडून डिसेंबर 2019मध्ये चार टक्के व्याजदराने चार लाख रुपये घेतले होते. त्याचे 80 हजार रुपये व्याज गायकवाडला दिले होते. लॉकडाऊनमुळे या रकमेतील मुद्दल व व्याज थकले होते. या पैशांच्या वसुलीसाठी गायकवाड मंगळवारी रात्री जामसांडेकर याच्या हॉटेलमध्ये आला होता. त्यावेळी त्याने जामसांडेकर यांना मारहाण करून चाकूहल्ला केला. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, गायकवाड फरार झाला आहे.