कोल्हापूर- ट्रकमध्ये झालेल्या स्फोटात चालकाचा मृत्यू

841
file photo

कोल्हापूरमध्ये ट्रकमध्ये झालेल्या स्फोटात ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्यासोबत असलेला अन्य एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक सोबत एखादा विस्फोटक पदार्थ घेऊन जात होता. त्याचाच स्फोट झाल्यानो ट्रक चालक मृत्युमुखी पडला.

ट्रक चालकाच्या शेजारी बसलेला त्याचा मित्र जखमी झाला. सुदैवाने त्याच्या जखमा गंभीर नसल्याने त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांना अद्याप त्या विस्फोटक पदार्थाचे तपशील मिळालेले नाहीत. त्यामुळे या मित्राकडे पोलीस चौकशी करत आहेत. या स्फोटामुळे परिसरात घबराट पसरल्याने पोलिसांनी या परिसराची नाकाबंदी केली असून स्फोट झालेल्या ठिकाणाची तपासणी करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या