कोल्हारजवळ शिवशाही बस आणि कारचा अपघात; पाच महिलांसह चालक जखमी

1421

नगर मनमाड महामार्गावर कोल्हार येथील प्रवरा नदी पूलाजवळ शनी मंदिरासमोर शिवशाही बस व एरटिका कारचा अपघात झाला. या अपघातात पाच महिलांसह चालक जखमी झाला आहे. जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. कार नगरकडे जात होती तर कोपरगाव-पुणे शिवशाही बस पुण्याकडे जात असताना हा अपघात घडला. अपर्णा अनिल लामा (वय 20), पार्वती चंद्रप्रकाश लामा (वय 64), पूनम अनिल लामा (वय 42), कांची देंढु डुबका (वय 65),नारीम उदय डुबका (वय 50) सर्व राहणार दार्जिलिंग, व निखील संजय अत्रे (वय 23, रा.राहता) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

कोपरगावहुन पुण्याकडे जात असलेली शिवशाही बस कोल्हार येथील प्रवरा नदी पूलाजवळ आली असता शनी शिंगणापूरकडून शिर्डीकडे जात असलेल्या कारने बसला धडक दिली. बसमध्ये आसाममधील साईभक्त महिला होत्या. या अपघातात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. तर कारमधील पाच महिला गंभीर जखमी असून चालकाच्या डोक्यालाही मार लागला आहे. अपघातातील कार शिर्डीतील असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या