जेएनयूनंतर कोलकातामधील कॉलेजमध्ये शुल्क वाढीविरोधात विद्यार्थिनींचे आंदोलन

336

नवी दिल्लीतील जेएनयूमध्ये शुल्क वाढी विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळले असतानाच कोलकातामध्येही शुल्क वाढीच्या विरोधात विद्यार्थिनी रस्त्यावर उतरल्या आहेत. येथील दक्षिणेश्वरमधील हिरालाल मजुमदार मेमोरियल वुमन्स कॉलेजमध्ये (Hiralal Majumdar Memorial College for Women) शुल्क वाढी विरोधात विद्यार्थिनींनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.

संतप्त विद्यार्थिनींनी कॉलेजमध्ये तोडफोडही केली. कॉलेजच्या वार्षिक शुल्कामध्ये वाढ केल्याने काही विद्यार्थिनी प्राचार्यांना भेटायला गेल्या होत्या, तेथे त्यांचा प्राचार्यांसोबत वाद झाला. त्यानंतर त्यांनी कॉलेज परिसरात तोडफोड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, दर तीन महिन्यांनी फि वाढत असल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी केला आहे. तर प्राचार्यांनी कॉलेजच्या नियमावलीप्रमाणेच फिमध्ये वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

 तर दुसरीकडे याचमुद्यावरून सर्वपक्ष राजकारण करत आहेत. तृणमूल काँग्रेसचे मंत्री मदन मित्र यांनी चर्चेतून या वाद सोडवला जाईल असे म्हटले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या