पणदूरमध्ये अवैध गोवा बनावटीच्या दारू जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्गनगरी

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास . पणदूर येथे अवैद्य दारू वाहतूकीवर कारवाई केली. यावेळी 1 लाख 42 हजार 80 रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह 7 लाख 42 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी वाहन चालक आंतोन लॉरेन्स रॉड्रिक्स रा. सातार्डा, सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक कुडाळ पणदूर अशी पेट्रोलिंग करत असताना बुधवारी मारुती स्विफ्ट कार (एमएच 07 एजी 4689 ) सुसाट वेगाने कणकवलीच्या दिशेने जाताना या पथकाला दिसली. ही गाडी तपासणीसाठी चालकाला थांबण्याचा ईशारा करण्यात आला. मात्र चालकाने गाडी न थांबविल्यामुळे या गाडीचा एलसीबीच्या पथकाने पाठलाग केला. गाडी थांबवून तपासणी केली असता वाहनामध्ये सुमारे 1 लाख 42 हजार 80 रूपये किमतीची गोवा बनावटीची अवैध दारु आढळून आली. त्यामुळे ही दारू व 6 लाखाची कार असा मिळून एकूण 7 लाख 42 हजार 80 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.