
मध्य रेल्वेने कोकणात गणपती सणासाठी पुन्हा 60 जादा गाड्या सोडल्या आहेत. कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून या दैनिक फेर्या सोडल्याने डोंबिवली, दिवा-ठाण्यातील प्रवाशांना फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे यंदाच्या एकूण फेर्यांची संख्या आता 166 इतकी झाली आहे.
कोकण मार्गावर मध्य रेल्वेने कालच 32 फेर्या सोडल्या असताना आज पुन्हा 60 अतिरिक्त फेर्या सोडण्याची घोषणा झाली आहे. मुळात कालच सीएसएमटी ते सावंतवाडी ट्रेन क्र.01137/38 या गाडीच्या दैनिक फेर्यांमध्ये 32 जरी वाढ केली असली तरी तिच्या तिकीटांना फारसा प्रतिसाद मिळालेला आहे.
ट्रेन क्र.01153 : ही स्पेशल ट्रेन 13 ऑगस्ट ते 11 नोव्हेंबर दरम्यान (30 फेर्या) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रा.10.15 सुटून ठोकूर येथे सायं.4.30वा. पोहचेल.
ट्रेन क्र.01154 : ही परतीच्या प्रवासाची गाडी 14 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान रोज ठोकूर येथून सायं.७.३०वा. सुटून लोकमान्या टिळक टर्मिनस येथे दु.1.25वा. पोहचेल.
थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, कुडाळ, थिविम, करमाळी, मडगांव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरूडेश्वर, भटकळ, मुकंबिका रोड, बैंदूर, कुंडापुरा, उडुपी, मुलकी, सुरतकल
सणाच्या पंधरा दिवस आधीच्या गाड्या सोडल्या
ट्रेन क्र.01137/01138 या विशेष गाडीच्या 21 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर) 44फेर्यांचे आरक्षण काही सेंकदात फुल्ल झाले. म्हणून रेल्वेने आज पुन्हा याच गाडीच्या 13 ते 20 ऑगस्ट अशा 32 फेर्या सोडल्या आहेत. त्यांचे आरक्षण गुरूवारी 8 जुलैला सुरू झाले, परंतू गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट रोजी असून पंधरा दिवसा आधीच्या गाड्या चाकरमान्यांना काही उपयोगाच्या नाहीत. चाकरमान्यांना सणाच्या दोन दिवस आधी कोकणात पोहचायचे असते, त्यामुळे प्रवाशांनी या गाडीकडे अक्षरशः पाठ फिरवली आहे.
गाडी कर्नाटकाच्या प्रवाशांसाठी सोडली का !
परतीच्या प्रवासासाठी कर्नाटकातील ठोकूर येथून सोडलेली ट्रेन क्र.01154 ही गाडी कर्नाटकातील ठोकुर येथून सायं. 5.30 वा. सुटून मडगावला मध्यरात्री 12.40 वा., सावंतवाडीला 2.20 वा., कुडाळला 2.40 वा., कणकवलीला 3.14 वा.,वैभववाडीला 3.44 वा. येणार आहे, त्यामुळे मध्यरात्री प्रवाशांना आपल्या खासगी वाहनाने रेल्वे स्टेशन गाठावे लागणार ेत्यामुळे ही गाडी कर्नाटकांच्या प्रवाशांसाठी सोडली का ? असा सवाल डोंबिवलीकर बळीराम राणे यांनी केला आहे.



























































