आंगणेवाडी जत्रा 4 फेबुवारीला

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील प्रसिद्ध भराडी देवीची यात्रा यंदा 4 फेब्रुवारीला होणार आहे. आज सोमवारी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

मालवणमधील भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येतात. या जत्रेला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. विशेष म्हणजे या यात्रेत सामान्य जनासह राजकिय नेतेमंडळी, कलाकारही उपस्थिती लावतात.