कर्जाच्या नावाखाली तरूणाला अडीच लाखाचा गंडा

9487

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

ग्लोबल फायनान्स या कंपनीकडे कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या दापोलीतील तरूणाला तब्बल 2 लाख 54 हजार 349 रूपयाला गंडा घातल्याची घटना घडली आहे. विशाल विटले (24) असे त्याचे नाव आहे.

विशाल करंजाणी दापोली येथे राहत असून त्याने ग्लोबल फायन्सास या कंपनीकडे कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे रोहित नावाच्या व्यक्तीला पाठवली होती. त्याने सांगितल्या प्रमाणे विशालने वेळोवेळी प्रोसेसिंग फी 2 लाख 54 हजार 349 रुपये भरले.त्यानंतरही विशालकडे 12 हजार 954 रुपये कर्जाची रक्कम परत मिळण्याकरीता भरायला सांगितल्यावर विशालला आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला.त्याने दापोली पोलीस ठाण्यात रोहित आणि शुभम अग्रवाल ग्लोबल फायनान्स बांद्रा यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली.

आपली प्रतिक्रिया द्या