
वायरी भूतनाथ येथील सुरेश कृष्णा धुरी यांच्या घरावर वडाचे झाड कोसळून संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. दरम्यान, आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी त्या ठिकाणी भेट देऊन घराची पाहणी केली. धुरी कुटुंबियांना आर्थिक मदत करत धीर दिला.
शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी नाईक यांनी तहसिलदार पाटणे यांच्याशी संपर्क साधत तात्काळ धुरी कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडेही यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार सुरेश धुरी यांना शासनाकडून 97 हजार 500 रु ची रक्कम नुकसान भरपाई स्वरूपात प्राप्त झाली आहे. नुकसान भरपाईपोटी 97 हजार 500 रु रक्कमेचा धनादेश त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. हि नुकसान भरपाई तात्काळ मिळवून देण्यासाठी आ. वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा केला.
































































