
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱया कोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायलयाच्या संभाजीनगर खंडपीठाकडून मुंबई खंडपीठाकडे वर्ग झाली आहे. याप्रकरणी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी आदेश दिले आहेत. तीन वर्षांपूर्वी कोपर्डीतील 15 वर्षांच्या मुलीवर तिघा नराधमांनी अत्याचार करून तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी जितेंद्र ऊर्फ बाबुलाल शिंदे (25), संतोष भवाळ (30), नितीन भैलुमे (26) या तिघा नराधमांना अटक केली. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या आरोपीना कट रचून मुलीवर अत्याचार करणे, तिची हत्या करणे आणि पोक्सो कायद्यानुसार फाशीची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरोधात आरोपींनी हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठासमोर अपील दाखल केले होते.






















































