महायुतीच्या भगव्या झंझावाताने विरोधकांचे अवसान गळाले, स्नेहलता कोल्हे यांनी भरला उमेदवारी अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव विधान सभेसाठी महायुतीच्या भाजप उमेदवार आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव घोषित केल्यानंतर गुरुवारी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या रॅलीतील भगव्या झंझावाताने विरोधकांचे अवसान गळाले आहे.

या भव्य रॅलीत माजी मंत्री शंकरराव कोल्हे साई संस्थान विश्वस्त बिपिन कोल्हे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे जिल्हाप्रमुख कैलास जाधव अमृत संजीवनी चे पराग संधान उपनगराध्यक्ष योगेश बागुल, भाजपा तालुकाप्रमुख शरद थोरात, गटनेते रवींद्र पाठक, शहर प्रमुख सनी वाघ, राजेंद्र सोनवणे, दीपक गायकवाड, असलम शेख यांच्यासह भाजपा-शिवसेना सह रिपाइं, रासप, शिवसंग्राम व रयत क्रांती या युतीच्या घटक पक्षाचे सर्व शिलेदार व शिवसैनिक, छावासैनिक मोठ्या विश्वासाने त्यांच्यासोबत दिसत होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याबरोबर माजी मंत्री शंकरराव कोल्हे, दत्तू नाना कोल्हे, नितीन कोल्हे, बिपिन कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे, विवेक कोल्हे, ईशान कोल्हे, रोहिणी कोल्हे सर्व कोल्हे कुटुंबीय यावेळी हजर होते.

मागच्या वर्षी एक महिला उमेदवार म्हणून मला सर्वांनी पक्षविरहित एक दिलाने साथ दिली यावेळी मी केलेल्या विकासकामांच्या शिदोरीवर आपण मला भरघोस मतांनी निवडून द्या अशी अपेक्षा आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली.