
अज्ञात चोरट्याने अज्ञात किराणा दुकानाचे लोखंडी शटर तोडुन आत प्रवेश करुन 65 हजाराचा किमतीचा माल तसेच रोख रक्कम स्वतःचे फायद्याकरता चोरुन नेला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी (13) रोजीचे रात्री 07.30 वाजता ते गुरूवारी (14) रोजीचे 02.30 वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने अज्ञात किराणा दुकानाचे लोखंडी शटर तोडुन आत प्रवेश केला. त्यानंतर 09 तेलाचे डबे, डाळ, काजु, बदाम, खोबरे, मुग दाळ, 02 कट्टे, मुग डाळ -01 कट्टा, तुर डाळ- 02 कट्टे, शेंगदाणे- 2 कट्टे, चना कट्टा, गुळ बॉक्स-01 व मसाल्याच्या प्रत्येकी सहा हजार किमतीच्या दोन पुड्या, एक मोबाईल फोन त्यामध्ये व्होडाफोन कंपनीचे सिमकार्ड असा 65 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला, अशी फिर्याद दुकानदार साहेबराव शिवाजी झाडगे यांनी कोपरगाव शहर पोलिसात दिली आहे.
सदर फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम 380, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक गवसणे तपास करीत आहेत.

























































