व्हॉट्सअॅपवरून वाढदिवसाचे फोटो डिलीट केले- तरुणास बेदम मारहाण

सामना प्रतिनिधी। कोपरगाव

व्हॉट्सअॅप वरून वाढदिवसाचे फोटो डिलीट करणाऱ्या तरुणाला 14 ते 15 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिसात 14 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10 मे रोजी आरोपी राहुल चंद्रहास शिरसाट याचे वाढदिवसाचे फोटो नितीन बाळासाहेब शेलार ( 29) पेंटर याने नितीन शेलार मित्र मंडळ या व्हॉट्सअप ग्रुपवरून डिलीट केले. याचा राग येऊन राहुल चंद्रहास शिरसाट याने हातातील लोखंडी गजाने नितीन शेलार यांच्या पाठीवर व पायावर वार करून जखमी केले. तसेच कैलास सिताराम सोमासे, अक्षय भालेराव, सुनील बाबुराव मोकळ, रवी वावळ, राहुल खंडीझोड, संतोष होतीस यासह इतर अनोळखी चार-पाच जणांनी 13 रोजी दुपारी तीनच्या सुमारास खडकी येथील सुरेश कदम यांच्या किराणा दुकाना समोर नितीन शेलार याला बेदम मारहाण केली. उपचारासाठी त्याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालय व नंतर श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे दाखल करण्यात आले आहे. नितीन शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १५ जणांवर रजिस्टर नंबर 160 / 2019 भादवि कलम 143, 147, 148, 149, 326, 323, 504, 506, 34 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाकोकली सपोनि. दीपक बोरसे हे करीत आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.