कोपरगावात आयशर गाडीसह आठ म्हशी चोरून पोबारा

753

आयशर गाडीत असलेल्या काळया रंगाच्या गोल शिंगाच्या आठ म्हशी अज्ञात चोरट्यांची चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास पुणतांबा फाटा गुरसळ वस्ती (ता. कोपरगाव) हद्दीत घडली. या प्रकरणी हज्जू अमीन शेख ( वय 32, रा. लामजना, ता. औसा जिल्हा लातूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटले की, सोमवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पुणतांबा फाटा वस्ती समोरील रोडवर आयशर गाडीला पांढऱ्या रंगाची ईरटीका आडवी लावून गाडी लावून गाडीतील तीन जणांनी मला व क्लिनरला आयशर गाडीमधून बळजबरीने उतरवले. कोयत्याचा धाक दाखवून माझ्या खिशातील 18 हजाराची रोकड व मोबाईल काढून घेतला. चौथ्या आरोपीने आयशर गाडीतील 8 म्हशीसह पोबारा केला. या म्हैशींची प्रत्येकी किंमत 25 हजार रुपये आहे. एकूण 2 लाख रुपये किमंतीच्या 8 म्हशी, 4 लाख रुपये किंमतीची आयशर गाडी, गाडीचे कागदपत्र, म्हशी खरेदीच्या पावत्या साडेपाच हजाराचे दोन मोबाईल, 18 हजाराची रोकड असा 6 लाख 23 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी ईरटीका गाडीतील चार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे व तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. याप्रकरणी बोरसे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या