
बागेत खेळण्यावरून लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणातून एका गटाने दुसऱ्या गटाच्या तरूणांना बेदम मारहाण केली आहे. यामध्ये तीन तरुण गंभीर जखमी झाले असून शहरातील गांधीनगर येथील आचारी हॉस्पिटल येथे रविवारी (ता.28 ) सायंकाळी पावणेसहा वाजता ही घटना घडली आहे. या मारहाणप्रकरणी इतरसह 15 जणांविरोधात कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी गायकवाड,सनि मंजुळ, शंकर मोरे, वैभव कुल्हाडे,राहुल चवंडके, ऋषी बारहाते, अभी बचडे व इतर 7 ते 8 जन सर्व रा. कोपरगाव जि.नगर, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरगाव शहर पोस्टे हददीत गांधीनगर बीट हददीत सायंकाळी 05/40 वा सुमारास शंकर गार्डन येथे लहान मुलांच्या झालेल्या भांडणाची कुरापत काढुन यातील आरोपी यांनी संगनमत करुन बेकायदेशीर गर्दी जमवुन हातात तलवार, कोयते, हॉकीस्टीक घेवुन त्यांचेकडील तलवार व लोखंडी कोयत्याने तौसिफ अकिल पठाण, शोएब करीम, शेख, आवेश, मुस्ताक शेख यांचेवर हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले.
जखमी पैकी तौसिफ अकिल पठाण उपचारासाठी शिर्डी श्री साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शोएब करीम, शेख, आवेश, मुस्ताक शेख यांच्यावर किरकोळ उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी शोएब आसिफ पठाण, (28), व्यवसाय पेंटीग काम, रा. गांधीनगर, यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात 31/2024 भा.व.वि कलम 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506, सह आम अॅक्ट 4,25(1-b)(b) प्रमाणे. 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोसई संजय पवार करीत आहेत.


























































