
तक्रारदार यास आरोपी न करण्याच्या मोबदल्यात पंधरा हजारांची लाच मागून बारा हजार स्वीकारणाऱ्या कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना नाशिक एसीबीने गुरुवारी (ता.7) अटक केली. संतोष रामनाथ लांडे , पो.हवालदार व राघव छबुराव कोतकर पो. शिपाई. असे त्या पोलिसांचे नाव आहे.
संतोष लांडे हा तालुका पोलीस ठाण्यात हवालदार आहे. यांच्याकडे असून सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी त्याने पोलीस शिपाई राघव कोतकर याला भेटण्यासाठी सांगितले. त्यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांचेकडे पंधरा हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती बारा हजार ठरले. यामुळे संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार शर्मिष्ठा घारगे-वालावलकर नाशिक, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी अपर पोलीस अधिक्षक, नाशिक नरेंद्र पवार,पोलीस उपअधीक्षक,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी ( दि.7) रोजी कोपरगाव तालुका पो.स्टेशन येथील CCTNS कक्षात स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले.
परशुराम कांबळे पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक पो. हवा. प्रफुल्ल माळी, पो हवा.सचिन गोसावी,पो. ना. विलास निकम सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक. सहकाऱ्यांनी हा सापळा यशस्वी केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे.





























































