
कोपरगाव येथील जिल्हा सिव्हिल रुग्णालयाच्या विशेष कोरोना कक्षात तपासणी झालेल्या 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित सात जणांचे अहवाल येणे बाकी आहे. एक जणाला आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन केले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी दिली.
कोपरगाव येथील 17 जणांना तपासणीसाठी शनिवारी नगर जिल्हा सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यापैकी 10 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून उर्वरित सात जणांचे अहवाल येणे बाकी आहे. कोपरगाव शहरात एका महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा झपाट्याने कामाला लागली आहे. आरोग्य आणि महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन वेगाने कामाला लागले आहेत. 17 जणांना तपासणीसाठी शनिवारी जिल्हा सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले होते. 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित सात जणांचे अहवाल येण्याचे बाकी आहे. कोपरगाव शहरात तीन दिवसांपूर्वी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध प्रशासन घेत आहे.






















































