#ElectionResults2019 कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी

1233

पुण्यातील कोथरूड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवला आहे. चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे याचा पराभव केला आहे.

कोथरूड मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. यामुळे मोठा गदारोळ झाला होता. चंद्रकात पाटील यांना ब्राह्मण महासंघाने विरोध केला, परंतु शेवटच्या टप्प्यात हा विरोध मावळल्याचे दिसले. या मतदारसंघात पाटील यांच्यासमोर मनसेचे किशोर शिंदे यांचे आव्हान होते.

#ElectionResults2019 – विजयी उमेदवारांची नावे वाचा एका क्लिकवर

शिंदे यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने हा मतदारसंघ आणखी रंगात आला. मतदानापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची मस्करी झाली. परंतु भाजपने या मतदारसंघात चांगलाच जोर लावल्याचे दिसून आले. येथे एकूण 43.23 टक्के मतदान झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या