
कोयना धरणातून 50 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने कृष्णा – कोयना नद्या दुथडी भरून वाहू लागले आहेत. कृष्णा कोयना नदीला महापूर आला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे तर नदीकाठी असणार्या धोका पातळीतील घरांमधील नागरिकांना हालविण्यात आले आहे.
कोयना धरणातून विसर्ग चालू झाला की, पाटण, कराड, सांगली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदी पातळीच्या पाण्यात वाढ होत आहे. अजूनही पावसाची रिपरिप चालू आहे. तर कोयना पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू आहे.

























































