कोयना धरणाच्या विद्युतगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोयना पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणात होणारी पाण्याची आवक नियंत्रणात ठेवण्यासाठी आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता धरणाच्या विद्युतगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना धरण व्यवस्थापनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे धरणात येणारे पाणी वाढत असून प्रति सेकंद 24 हजार 275 क्यूसेक पाण्याची आवक धरणात होत आहे.

सध्या कोयना धरणात 35.46 टीएमसी पाणीसाठा असून पाणी पातळी 2086.4 फूट एवढी झाली आहे. आजपर्यंत कोयना 626, नवजा 668 तर महाबळेश्वर 747 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या