राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानी चित्रपट सृष्टीत शोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचं सोमवारी निधन झालं. त्या ८८ वर्षांच्या होत्या. सोमवारी पहाटे ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

राज कपूर यांनी १९४६ मध्ये कृष्णा यांच्याशी विवाह केला होता. कृष्णा यांच्या पश्चात रणधीर, ऋषी, राजीव कपूर हे मुलगे तर रितू नंदा आणि रिमी जैन या दोन मुली, जावई, नातवंडे, नातजावई, पतवंडे असा परिवार आहे. कृष्णा यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर चित्रपट वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे.

summary- krishna raj kapoor passes away