कुडाळ तालुक्यातील 9 पैकी 5 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया गुरूवारी पार पडली. यात 9 पैकी 5 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. या ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला झाली होती. त्यानंतर आज सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सर्व ग्रामपंचायतीच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.

पाच ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदी शिवसेना पुरस्कृत उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. यात वसोली – सरपंच अजित परब, उपसरपंच सदानंद गवस, पोखरण-कुसबे – सरपंच समिक्षा जाधव, उपसरपंच भाग्यश्री गावकर आकेरी – सरपंच महेश जामदार, उपसरपंच प्रमोद घोगळे, माड्याचीवाडी – सरपंच सचिन गावडे, उपसरपंच योगेश्वरी कोरगांवकर, गिरगांव-कुसगाव – सरपंच स्नेहा सावंत, उपसरपंच संतोष सावंत, यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या पाचही ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकल्याची माहिती शिवसेनेचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक व तालुका संघटक बबन बोभाटे यांनी दिली. या निवडीनंतर शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, गटनेते नागेंद्र परब, उपसभापती जयभारत पालव, तालुका संघटक बबन बोभाटे, जि. प. सदस्य राजू कविटकर, पं. स. गटनेत्या श्रेया परब, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी पं. स. सदस्य अतुल बंगे यांच्यासह पदाधिका-यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन केले.