जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी! कुडाळात पुरुषांनी केली वटपौर्णिमा साजरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सात जन्मी हाच पती मिळावा, यासाठी विवाहित महिला वडाच्या झाडाला सात फेऱया मारून वटपौर्णिमा साजरी करतात. कुडाळ येथे मात्र पुरुषांनी गेली 12 वर्षे वटपौर्णिमेची अनोखी प्रथा जोपासली आहे. या प्रथेनुसार गवळदेव मंदीर येथे पुरुषांनी वटवृक्षाचे पूजन करून आणि सात फेरे मारीत वटपौर्णिमा साजरी केली. जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला निरोगी आयुष्य लाभावे, अशी प्रार्थना या वेळी उपस्थित पुरुषांनी केली.

कुडाळ बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम दरवर्षी राबविला जात आहे. या उपक्रमातून स्त्राr-पुरुष समानतेचा संदेश दिला जातो. उपक्रमाच्या सुरुवातीला कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून देवाच्या चरणी गाऱहाणे घालण्यात आले. त्यानंतर वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.