कुडाळ, पावशी, वेताळबांबर्डेत घरांना पुराचा वेढा; अनेक घरांमध्ये पाणी शिरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले दोन दिवस सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी कुडाळ तालुक्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी नदीकाठच्या भागात शिरून जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, पुडाळ भैरववाडी, काळपनाका, कविलकाटे, पावशी, वेताळबांबर्डे व पणदूर या भागातील सुमारे 30 ते 35 घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले. पुराच्या भीतीने या भागातील नागरिक सुरक्षित ठिकाणी दाखल झाले. माणगाव खोऱयातील आंबेरी येथील ब्रिटिशकालीन पुलावर पाणी आल्याने माणगाव खोऱयातील सुमारे 25 गावांचा माणगावशी संपर्प तुटला. या पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली. पुडाळ शहरातील हॉटेल गुलमोहरजवळील रस्ता व रेल्वे स्टेशन रस्त्यावर पाणी आल्याने या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शिवाय ग्रामीण भागातील ठिकठिकाणच्या सखल भागातील रस्त्यावर पाणी आले. वादळी वाऱयासह झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडून नुकसान झाले. वीज दूरध्वनी सेवा काही काळ विस्कळीत झाली.

पावशी शेलटेवाडी, सीमावाडीतील घरांपर्यंत पाणी

पावशी शेलटेवाडी, सिमावाडी व ठिकाणच्या सुमारे 15 ते 20 घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. अनेक घरांमध्ये पाणी शिरून साहित्याचे नुकसान झाले. पावसाचा जोर वाढत असल्याने पुराच्या भीतीने नागरिक सुरक्षित स्थळी दाखल झाले. तसेच गुरे व वाहनेही सुरक्षित ठिकाणी आणून ठेवली.

रस्ते पाण्याखाली, वाहतूक ठप्प

पुडाळ शहरातील हॉटेल गुलमोहरजवळील रस्त्यावर भंगसाळ नदीच्या पुराचे पाणी आले. त्यामुळे शहरातील हे दोन्ही रस्ते वाहतुकीस बंद झाले. काही वाहनधारकांनी पाण्यातूनच वाहने मार्गस्थ केली. कविलकाटे येथेही रस्त्यावर पाणी आले.

संगमेश्वर बाजारपेठेत पाणी घुसले

संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱया दिवशी पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे गडनदीला पूर येउन पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत घुसले आहे. यावर्षी सलग तिसऱयांदा माखजनला पुराचा तडाखा बसला आहे. तालुक्यात गेल्या 24 तासांत 100 पेक्षा अधिक मिमी पाऊस कोसळला आहे. शुक्रवारपासून आतापर्यंत पावसाने 250 मिमीची सरासरी गाठली आहे. शनिवारी स्वातंत्र्यदिनी पावसाने जोर लावला तो जोर दिवसभर कायम असल्याने गडनदीला पुर आला. यामुळे नदीकिनारी असलेल्या माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले. दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने व्यापारी आणि ग्रामस्थ सतर्प होते. यामुळे पाणी काठाबाहेर येऊ लागताच सर्वांनी आपापले सामान सुरक्षित स्थळी हलवले. काल रात्रभर पाऊसाचा जोर कायम होता. त्यामुळे आज सकाळीही बाजारपेठेतील पाणी कमी न झाल्याने बहुतांश दुकाने बंदच ठेवण्यात आली.

आंबेरी पुलावर पाणी; 25 गावांचा संपर्प तुटला

माणगाव खोऱयातील सह्याद्री पट्टय़ात धुवांधार पाऊस कोसळला. या पावसाने निर्मला नदीला पूर आल्याने आंबेरी येथील ब्रिटिशकालीन पुलावर रविवारी सकाळी पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दुपारपर्यंत हा पूल पाण्याखाली होता. त्यामुळे शिवापूर, दुकानवाड, आंबेरी, उपवडे, वसोली आदी सुमारे 25 गावांचा माणगावशी संपर्प तुटला होता. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक खोळंबली होती. दुकानवाड भागातील सखल भागातील काॅजवेही पाण्याखाली गेले होते. या भागातील जनजीवन विस्कळीत झाले.