पाकिस्तान कश्मीरात घुसवतोय कोरोनाग्रस्त दहशतवादी

249

लडाखमधील चीन सीमेवर संघर्ष सुरू झाल्यापासून पाकिस्तानच्या हालचालीही वाढल्या आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानवडून दहशतवादी घुसवले जात आहेत. पण यावेळी फक्त दहशतवादी नव्हेत तर कोरोनाग्रस्त दहशतवादी कश्मीरात सोडले जात आहेत. शनिवारी कुलगाम येथे लष्कराने चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह होते.

कुलगामच्या आरा गावामध्ये ही चकमक झाली. दहशतवादी लपले असल्याची खबर मिळाल्यानंतर लष्कराने या गावाला वेढा घातला. गावातील वयोवृद्धांच्या माध्यमातून या दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन वरण्यात आले. पण गावात जवानांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात ते मारले गेले. या चकमकीत एव जवान जखमी झाला.

दहशतवाद्यांच्या मृतदेहांची वैद्यकीय तपासणी करताना त्यांची कोरोना चाचणीही केली गेली. या दहशतवाद्यांमधील एक परदेशी आहे, तर दुसऱयाची ओळख अली भाई ऊर्फ हैदर अशी पटली आहे. हिजबुल मुजाहिदीन संघटनेशी त्यांचे संबंध होते. त्यांच्याजवळ शस्त्रास्त्र आणि दारूगोळाही सापडला. या दहशतवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल आल्यानंतर मात्र
लष्कर अधिकच सावध झाले आहे.

पुलवामात पुन्हा एकदा सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला
पुलवामा येथेही पुन्हा एवदा केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. त्यात सीआरपीएफच्या 182 बटालियनचा एव जवान जखमी झाला. सीआरपीएफने तातडीने या भागात शोधमोहीम हाती घेतली. त्यादरम्यान पुलवामाच्या गंगू भागात त्यांना एक आयईडी बॉम्ब सापडला. तो निकामी करण्यात आला. यापूर्वी पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. त्यात 40 जवान शहीद झाले होते. हिंदुस्थानने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक करून त्याला प्रत्युत्तर दिले होते

आपली प्रतिक्रिया द्या