सरकारने मदत केली नाही तर आयडिया-व्होडाफोन बंद होणार – कुमार मंगलम बिर्ला

986

सरकारने मदतीचा हात दिला नाही तर व्होडाफोन- आयडियासाठी हा कथेचा शेवट असेल असे मला वाटते, अशा शब्दांत व्होडाफोन-आयडिया कंपनीचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी शुक्रवारी हतबलता व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने देयके भरण्यासंदर्भात दिलेल्या आदेशामुळे व्होडाफोन- आयडिया कंपनी संकटात सापडली आहे. सरकारच्या मदतीवरच या कंपनीचे भवितव्य अवलंबून असल्याचे बिर्ला म्हणाले.

भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया तसेच टेलिकॉम क्षेत्रातील इतर कंपन्यांनी टेलिकॉम लायसन्स फीच्या रूपात 1.47 लाख कोटी रुपयांची देयके भरावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे. या आदेशामुळे टेलिकॉम क्षेत्र संकटात सापडले असून सरकारकडून मदतीची अपेक्षा केली जात आहे. व्होडाफोन- आयडियाच्या डोक्यावर 53,038 कोटींच्या देयकाचा भार आहे.

सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही तर व्होडाफोन-आयडियाच्या कथेचा शेवट होईल. आम्ही आमचे दुकान बंद करू. – कुमार मंगलम बिर्ला, चेअरमन, व्होडाफोन-आयडिया

आपली प्रतिक्रिया द्या