कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्या पूजा परुळेकर यांची आत्महत्या

2438

मालवण कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्या सौ. पूजा प्रसाद परुळेकर (वय- ३२) यांनी शुक्रवारी रात्री  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबतची खबर दीर अवधूत परुळेकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली.

कुंभारमाठ येथे वास्तव्यास असलेल्या सौ. परुळेकर या कुंभारमाठ ग्रामपंचायतीमधून स्वाभिमानच्या सदस्य म्हणून त्या निवडून आल्या होत्या. शनिवारी सकाळी ६.४० वाजण्याच्या दरम्यान त्यांची जाऊ यांना पूजा यांनी घरातील पंख्यास ओढणीने गळफास लावल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड करताच घरातील अन्य मंडळींनी त्या खोलीकडे धाव घेतली. गळफास घेतलेल्या स्थितीत पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. हे वृत्त कळताच स्थानिक ग्रामस्थांनी परुळेकर यांच्या निवासस्थानी गर्दी केली.

घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण,  डी. व्ही. जानकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पिंपळपार येथील ज्युलि सायकल स्टोअरचे प्रसाद परुळेकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे सासरे, पती, मुली, दीर, जाऊ, पुतणे असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या