विरारमध्ये ‘कुणबी जल्लोष’ उत्साहात साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वसई

वसई-विरार कुणबी समाज मंडळाच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी विरारमध्ये ‘कुणबी जल्लोष 2019’ हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमात कविता वाचन, गित गायन आणि सास्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह माजी खासदार बळीराम जाधव, राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, सिनेअभिनेत्री सायली पाटील, मोहन पाटील, डॉ. देवेंद्र पाटील, पत्रकार शरद पाटील या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम पष्टे, संतोष वेखंडे, वैभव सातवी, मिलींद पाटील, अनिल पटारे, हेमंत अधिकारी यांच्यासह अनेकांनी मोलाचे सहकार्य केले.