कुर्ला इमारत दुर्घटना; घरमालक व कॉण्ट्रक्टरवर गुन्हा दाखल, एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ला पूर्वेकडील नाईक नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही तळ अधिक तीन माळय़ांची धोकादायक इमारत कोसळून 19 रहिवाशांचा मृत्यू व 15 जण जखमी झाल्याच्या दुर्घटनेप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. घर मालक व खोल्या भाडेतत्त्वावर घेणाऱया एकावर हा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच दिलीप विश्वास याला अटक करण्यात केली.

महानगरपालिकेने ही इमारत यापूर्वी धोकादायक घोषित केली होती. तरीदेखील घरमालक व इतर अनोळखी इसमाने भाडेकरूंना इमारतीमधील खोल्या राहण्यास दिल्या होत्या. त्यामुळे नेहरू नगर पोलिसांनी रजनी राठोड, किशोर चव्हाण, बाळकृष्ण राठोड व अन्य घर मालक तसेच या इमारतीत दोन खोल्या भाडय़ाने घेणारा दिलीप विश्वास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.