कुर्ल्यातील गोरखनाथ पथकाच्या गोपिका सीमेवर फोडणार दहीहंडी

देशातील पहिले महिला गोविंदा पथक म्हणून कुर्ला येथील गोरखनाथ महिला गोविंदा पथकाचे नाव अभिमानाने घेतले जाते. यंदा या पथकातील गोपिका गुजरातला रवाना होणार असून गांधीनगर येथील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयासमोर दहीहंडी पह्डणार आहेत.

एकेकाळी गोविंदा पथके म्हटले की पुरुषांची मक्तेदारी असायची. आता पुरुषांप्रमाणे महिलांची दहीहंडी पथकेदेखील उंचच उंच थर लावताना दिसतात. स्त्री-पुरुष समानता हा उद्देश डोळय़ापुढे ठेवून गोरखनाथ दहीहंडी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या महिला दहीहंडी पथकाने मुंबईसह देशभरात नावलौकिक मिळवला आहे. आतापर्यंत गोरखनाथ पथकातील गोपिकांनी जयपूर, मथुरा, कर्नाटक, शनि-शिंगणापूर आदी ठिकाणी दहीहंडी फोडली आहे.

यंदा रौप्य महोत्सवानिमित्त आमच्या पथकातील गोपिका 17 ते 21 ऑगस्टदरम्यान गुजरातमधील गांधीनगर, दांतीवाडा, श्री नडेश्वरी माता मंदिर, नाराबेट बॉर्डर, अक्षरधाम येथे दहीहंडी पह्डणार आहेत, अशी माहिती गोरखनाथ महिला दहीहंडी पथकाचे संस्थापक भाऊ कोरगावकर आणि अध्यक्षा शलाका कोरगावकर यांनी दिली.