रोजंदारी मजूर बनला यू-ट्यूबर; सांबार-भाताचा व्हिडीयो बनवून लाखोंची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोजंदारीवरील एका मजुराचा यशस्वी यू-टय़ुबर बनण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. ओडिशाच्या संबलपूर जिह्यातील इसाक मुंडा याची कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मुंडाच्या हातचे काम गेले, रोजगार थांबला. त्यानंतर मुंडाने यू-टय़ूबवर व्हिडियो बनवायला सुरुवात केली. शिजवलेला भात आणि सांभार खाताना त्याने स्वतŠचा एक व्हिडियो तयार केला. बघता बघता हा व्हिडियो जोरदार व्हायरल झाला. अवघ्या काही दिवसांत त्याला पाच लाखांपेक्षा जास्त ह्यूज मिळाले.

व्हिडीयो बनवण्यासाठी सर्वात आधी इसाक मुंडाने तीन हजार रुपये कर्ज काढून छोटा स्मार्टफोन विकत घेतला. मुंडा सांगतो, मी गरीबाचं घर आणि गावातील जीवन यावर व्हिडियो बनवतो. आम्ही काय आणि कसं खातो याचं दर्शन घडवतो. माझे हे काम लोकांना आवडतेय. त्यातून चांगली कमाईदेखील होतेय.

  • इसाक मुंडा इंटिंग या यू-टय़ूब चॅनेलचे सात लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. ज्या मजुराला एकेकाळी खाण्यापिण्याचे वांदे होते आज तोच या चॅनेलमुळे लखपती बनला आहे. ऑगस्ट 2020मध्ये इसाक मुंडाने यू-टय़ूब चॅनेलच्या माध्यमातून पाच लाखांचे उत्पन्न मिळवले. त्या पैशांतून घर बांधले. कुटुंबाला आर्थिक संकटातून सावरले. येत्या काळात आपल्या क्षमतेनुसार गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुंडाने सांगितले.