अमेरिकेवरील ९/११ हल्ल्याच्या सूत्रधाराची मुलगी लादेनची सून, ‘द गार्डियन’चा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याच्या मुलाशी अमेरिकेवरील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख मोहम्मद अट्टा याच्या मुलीचे लग्न झाल्याचा गौप्यस्फोट लादेनच्या सावत्र भावांनी केला आहे. लादेनचा मुलगा हमजा आणि अट्टाची मुलीचा अफगाणिस्तानमध्ये विवाह झाला होता, असे त्यांनी ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

लादेनच्या तीन पत्नीपैकी खैरिया साबर या पत्नीचा हमजा हा मुलगा. पाकिस्तामधील अबोटाबादमध्ये २०११मध्ये लादेनचा खात्मा केल्यानंतर हमजा याने अल कायदा या दहशतवादी संघटनेची जबाबदारी स्वीकारली. लादेनचा बदला घेऊ आणि अमेरिकेवर पुन्हा हल्ला करू, अशी धमकी त्याने दिली आहे. लादेनच्या खात्म्यानंतर लादेनच्या तीन पत्नी आणि त्यांची मुले यांना सौदी अरेबियाने आश्रय दिला होता. त्याचबरोबर ते लादेनची आई आलिया घनेम हिच्याही संपर्कात होते, अशी माहिती अहमद आणि हसन अल अट्टा यांनी दिली.