
शेतकरी वर्गात सरकारबद्दल नाराजीची भावना राहू नये या उद्देशाने महायुती सरकारने कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पात केली. मात्र निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना देण्यात आलेल्या 2100 रुपये अनुदानासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. लाडक्या बहिणींच्या अनुदानाचा खर्च भागविताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागते. यातच अधिक 600 रुपये द्यायचे म्हटल्यास मोठी आर्थिक ओढाताण होणार आहे. पुढील तीन वर्षे कोणत्याही निवडणुकांची घाई नाही. यामुळे 2029 च्या निवडणूक वर्षापर्यंत 2100 रुपये अनुदानासाठी लाडक्या बहिणींना वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.



























































